Garge Homoeopathic Clinic

best homeopathy doctor in pune-Dr. Pradeep garge

Diabetes and Diet/ मधुमेह व आहार

  • मधुमेहाच्या उपचारात आहार हा महत्वाचा घटक आहे.
  • समतोल आहारात कडधान्य, डाळी, तेल, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा.
  • भात खाल्याने साखर वाढते हा समज चुकीचा आहे. 
  • डाळीच्या सेवनाने साखर वाढत नाही, त्यामुळे सर्व डाळी खाण्यास योग्य आहेत.
  • फायबर किंवा चोथायुक्त आहार रक्तातील साखर व चरबी कमी करण्यास मदत करतो. पूर्ण कडधान्ये, सर्व हिरव्या पाले-भाज्या यामध्ये चोथा भरपूर प्रमाणात असतो. सर्व कडधान्यात (गहु, ज्वारी, बाजरी, तांदूळ इ.) अंदाजे ७७% पिष्टमय पदार्थ असतात. त्यां योग्य प्रकारे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढत नाही.
  • सर्व साधारण हिरव्या पालेभाज्या भरपूर खाण्यास हरकत नाही.
  • फळभाज्या प्रमाणात खाव्यात.
  • आहारात चरबीचे प्रमाण कमी ठेवल्यास रक्तातील चरबी वाढत नाही व रक्तवाहीन्या कठी होत नाहीत.
  • डालडा, साय, लोणी खाणे अयोग्य आहे. या पदार्थामुळे शरीरातील घातक चरबीचे प्रमाण वाढते.
  • प्रमाणात चांगले तूप घेण्यास हरकत नाही. सतत एकाच प्रकारचे खाद्य तेल खाण्यापेक्षा ते बदलत राहणे जास्त योग्य आहे.
  • दही,दूध, ताक, साय काढून प्रमाणात घेण्यास हरकत नाही.
  • मांसाहारी व्यक्तीने चरबीयुक्त मांसाहार टाळावा.
  • मासे, चिकन व अंड्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
  • साखर, गूळ, मध, गोड पदार्थ, केक, पेस्ट्री, आईस्क्रीम, शीतपेय, फळांचा रस यांचा वापर मधुमेहास घातक आहे.
  • मैद्याचे पदार्थ, ब्रेड, पाव, नुडल्स, समोसा, कचोरी इ. खाणे टाळावे.
  • मधुमेही व्यक्तीने दिवसभरात अन्न विभागून खावे. उपवास करु नयेत, उपवासाच्या पदार्थात भगर, राजगीरा, साबुदाण्यापेक्षा जास्त योग्य.
  • मधुमेह आटोक्यात असल्यास साधारण १०० ते १५० ग्राम वजनाचे फळ खाण्यास हरकत नाही. फळात चोथा व व्हिटॅमीन्स् असतात.
  • समतोल आहार, योग्य व्यायाम, नियमीत तपासणी व उपचार घेतल्यास मधुमेह आटोक्यात राहतो व दुष्परिणाम टळतात/टाळता येतात.

Diabetes and Diet

  • Diet is an important factor in the treatment of diabetes.
  • A balanced diet should include adequate amounts of cereals, pulses, oils, vegetables, dairy products, fruits.
  • It is a misconception that eating rice increases sugar.
  • Consumption of pulses does not increase sugar, so all pulses are edible.
  • A high-fiber diet helps lower blood sugar and fat. Whole grains, all green leafy vegetables are rich in quarts. All cereals (wheat, sorghum, millet, rice, etc.) contain about 77% starch. Properly covered, it will withstand a lot of adverse conditions.
  • Eat plenty of fruits and vegetables.
  • Reducing the amount of fat in the diet does not increase blood fat and does not harden the blood vessels.
  • It is inappropriate to eat dalda, cream, butter. This substance increases the number of harmful fats in the body.
  • It is okay to take a good amount of ghee. It is better to keep changing it than to eat the same type of edible oil all the time.
  • There is no problem in removing milk, buttermilk, and cream.
  • Non-vegetarians should avoid fatty meats.
  • Fish, chicken, and eggs should be included in the diet in moderation.
  • Consumption of sugar, jaggery, honey, sweets, cakes, pastries, ice cream, soft drinks, fruit juices is dangerous for diabetics.
  • Flour, bread, bread, noodles, samosas, kachori, etc. Avoid eating.
  • People with diabetes should eat food throughout the day. Do not fast, Bhagar, amaranth, sabudana are more suitable in fasting food.
  • If the diabetes is under control, it is okay to eat fruits weighing about 100 to 150 grams. The fruit contains quarts and vitamins.
  • Balanced diet, With proper exercise, regular checkups, and treatment, diabetes can be controlled and side effects can be avoided.