Diabetes and Diet/ मधुमेह व आहार
मधुमेहाच्या उपचारात आहार हा महत्वाचा घटक आहे. समतोल आहारात कडधान्य, डाळी, तेल, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. भात खाल्याने साखर वाढते हा समज चुकीचा आहे. डाळीच्या सेवनाने साखर वाढत नाही, त्यामुळे सर्व डाळी खाण्यास योग्य आहेत. फायबर किंवा चोथायुक्त आहार रक्तातील साखर व चरबी कमी करण्यास मदत करतो. पूर्ण कडधान्ये, सर्व …